Welcome

My mission is to empower people to find inner clarity and personal happiness through simple, uplifting, motivational, and applicable articles.

हुशार आणि मुर्ख

August 26, 2015

एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक राजाने
एकदा चर्चा करायला त्याला बोलवले.

भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा म्हणाला
 " महाशय तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ? काही त्याला शिकवा. त्याला सोने आणि चांदी यात जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही " आणि मोठ्याने हसू लागला

हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...तो घरी गेला. त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "
" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला
" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?
म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!
माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!

मुलगा म्हणाला
"राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो. रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे.
मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो. त्याच्या सोबत गावातील सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातात सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल आणि मी चांदीचे नाणे उचलतो ..
त्यामुळे तिथे असलेले सगळे मोठ्याने हसतात ... सार्‍यांना मजा वाटते ....... असे रोज घडते

मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही न राहून त्याने मुलाला विचारले  " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ? असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"

मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला. कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या नाण्यांनी भरलेली होती.

हे पाहून विद्वान अवाकचं झाला

मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल तर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.
मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "

सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!
काय वाटते ?

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
काहीजण त्यातुन मोती उचलतात,
काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे...