Welcome

My mission is to empower people to find inner clarity and personal happiness through simple, uplifting, motivational, and applicable articles.

तुझाच भांडखोर नवरा....

January 20, 2012

एक प्रेम पत्र नवऱ्याने बायकोला लिहिलेले...............

प्रिय श्वेता,

काल सकाळी कामाला निघताना उगाच माझ्याशी कटकट केलीस आणि मी हि त्यावर खूप चिडून तुला नको नको ते बोलून बाहेर पडलो, वाटल होत कि दिवसभरात एखादा कॉल करशील

सॉरी बोलशील नायतर एखादा मेसेज तरी करशील, पण आपल काय मी एक हट्टी आणि तू सात हट्टी, कितीही काही झाल तरी माफी मागायला कधीच कोणी एक पुढे येत नाही. तुला काय

तू बसतेस अबोला घेवून. संध्याकाळी एकदा मेसेज टाईप करायला मोबाईल हातात घेतला पण नंतर विचार केला मी का पुढाकार घेवू नेहमी नेहमी म्हणून नाही पाठवला सॉरी चा मेसेज.

घरी आलो तर तुझा चेहरा फुगलेलाच होता रागाने मी पण म्हंटल जावूदे थोडा वेळात होईल हळू हळू नॉर्मल पण छे जेवताना तुझ्याशी बोलेन म्हणालो तर मुद्दामून मला एकट्यालाच

जेवायला वाढलस आणि मला म्हणालीस कि मी बाहेरून जेवून आली. माझा राग अजून वाढला परत आपल भांडण झाल रात्री. मी पण अर्धवट जेवून उठलो तसाच रागारागाने. बाहेर गेलो

आणि एक सिगरेट पिवून आलो. तोपर्यंत तू चादर डोक्यावर घेवून हॉलमध्ये झोपली होतीस. अजूनच राग वाढला.
आज सकाळी मला ऑफिसच्या वेळेवर मला उठावलस पण नाही आणि स्वत तयारी करून गेलीस कामाला. माझी झाली ऑफिसला दांडी. पण नंतर किचन मध्ये गेलो चहा बनवायला तर

रात्रीच एका माणसाच जेवण बाकी होत. म्हणजे तू स्वताच जेवण बनवल होतास पण मला खोट बोललीस कि मी बाहेरून खावून आली. आणि स्वत उपाशी झोपलीस. i am so sorry

:( श्वेता....... उगाच भांडण ताणल मी. घरात आल्या आल्या हे लेटर तुला मिळालंच आहे, आता एक काम कर किचनमध्ये जा मी चहा बनवून ठेवलाय तो फक्त गरम करून घे आणि

तिथेच समोर तुला आवडतात ती Littile Heart ची biscuits ठेवलेत ते खा. आणि आज तुला पूर्ण आराम मिळण्यासाठी मी तुझ्या आवडीच मला जस जमलाय तस पूर्ण जेवण बनवून

ठेवलंय. मी येतोच थोड्या वेळात....आणि हो सर्व राग आता बाजूला ठेव.

तुझाच
भांडखोर नवरा....