Welcome

My mission is to empower people to find inner clarity and personal happiness through simple, uplifting, motivational, and applicable articles.

खडे

July 22, 2015




एकदा काही लोकांचा समूह चालत चालत पर्यटनाला निघाला.   
वाटेत त्यांना एक अंधारी बोगदा लागला. त्यांना त्या बोगद्यात काहीच दिसत नव्हते. 
त्या लोकांच्या पायाला काही खडे टोचू लागले.
काही लोकांनी ते खडे आपल्यानंतर येणा-या इतरांना टोचू नये,ईजा होवू नये म्हणून ते खडे उचलुन खिशात ठेवायला सुरु केले.
काहींनी जास्त खडे उचलले तर काहींनी कमी उचलले.
काही लोकांनी असा विचार केला की आपण कशाला फुकट उचलायचे.?
आपल्याला त्रास झालाच ना मग तसा इतरांनाही होइल.
त्यामुळे त्यातील काहींनी तर खडे उचललेच नाहीत.

जेव्हा ते सर्वजण त्या बोगद्याच्या बाहेर आले व खिशातून काढुन टाकण्यासाठी खडे बाहेर काढले तर ते खडे नव्हते तर अस्सल हीरे होते.
त्यावेळी कमी उचललेले लोक हळहळु लागले की जास्त खडे उचलले असते तर आपल्याला हीरे जास्त मिळाले
असते.

न उचललेले लोक पश्चाताप करू लागले.

आपले जीवनही या अंधा-या बोगद्यासारखेच असते व खड़े म्हणजे चांगुलपणा किंवा सत्कर्म आहे.

सत्कर्म हिऱ्यासारखे बहुमोल व किंमती आहे.... म्हणुन मिञांनो कायमच सत्कर्म करीत राहा...

आपोपापच फळ मिळेल...!!