Welcome

My mission is to empower people to find inner clarity and personal happiness through simple, uplifting, motivational, and applicable articles.

आपण ह्यातून कोणाला निवडाल?

July 23, 2015

मोठ्यांच्या रात्रीच्या शाळेत एके दिवशी मानसशास्त्राचे शिक्षक विध्यार्थ्यांना एक खेळ खेळण्यास सांगतात.

सर्वजन उत्सुकतेने विचारतात
"कोणता खेळ सर?"


शिक्षक एका विध्यार्थ्याला मदत करायला विनंती करतो.

 संगीता नावाची एक स्त्री पुढे येते. .




शिक्षक तिला फळ्यावर तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या अश्या ३० व्यक्तींची नावें लिहायला सांगतात.

संगीता तिच्या घरातील, नातेवाईकांची,  मित्र-मैत्रिणींची आणि शेजाऱ्यांची मिळून अशी ३० नावें फळ्यावर लिहिते.

शिक्षकाने नंतर तिला त्यातील तीन अशी नावें पुसून टाकण्यास सांगितली कि जी तिच्या दृष्टीकोनातून तेवढी महत्वाची नाहीत. संगीताने आपल्या मित्रांची नावें पुसली.

आता शिक्षकाने तिला ५ आणखीन नावें पुसण्यास सांगितली आणि ह्या खेपेस तिला आपल्या शेजाऱ्यांची नावें
पुसावायास लागली.

हा सिलसिला असाच पुढे चालू राहिला जोपर्यंत फळ्यावर फक्त चार नावें पुसायची बाकी राहिली होती.

जी चार नावें संगीताच्या दृष्टीने सर्वात महत्वाची ठरली ती होती - आई,वडील,नवरा आणि मुलगा.

संपूर्ण वर्ग आता निस्तब्ध झाला होता कारण त्यांना कळून चुकले होते कि ह्यापुढचा खेळ संगीताला फार कठीण जाणार आहे.

 तिला आता सर्वात कठीण असा निर्णय घेणे भाग पडणार आहे. शिक्षकाने आता तिला तिच्यापुढील दोन नावें पुसण्यास सांगितली. मोठ्या नाईलाजाने आणि जड अंतःकरणाने तिने आपल्या आई वडिलांची नावें पुसून टाकली. "

अजून एक नांव पुसून टाक" शिक्षकाने फर्मावले.  संगीता आता पूर्णपणे हवालदिल, निराश झाली होती.

थरथरत्या हाताने तिने मुलाचे नाव पुसले आणि ओक्साबोक्शी रडायला लागली.


शिक्षकाने संगीताला तिच्या जागेवर जाऊन बसायला सांगितले. थोड्या वेळाने जेव्हा तिचे दु:ख आवरले तेव्हा तिला विचारले कि आई, वडील वा मुलगा ह्यापैकी एकाचे नाव तिने का नाही ठेवले

तिच्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणून नवऱ्याऐवजी, ती आई किंवा वडिलांचे नाव ठेवू
शकली असती कारण त्यांनी तिला जन्म देऊन लहानाचे मोठे केले होते किंवा ज्याला तिने जन्म दिला अशा तिच्या मुलाचे नाव ती शेवटी ठेवू शकली असती.

मग नवराच का तिच्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती तिला वाटली? 


टाचणी पडली तरी आवाज येईल अशी स्मशान शांतता वर्गात पसरली होती आणि सर्वजण आता संगीता काय उत्तर देते ह्याकडे कान टवकारून वाट बघत होते.

संगीता तिच्या जागेवरून उठून उभी राहिली आणि सावकाश म्हणाली

"एक दिवस माझे आई-वडील
मला सोडून जातील. माझा मुलगा सुद्धा मला सोडून जाईल त्याच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी,  लग्ना नंतर वा
तत्सम काही कारणांमुळे.

तेव्हा शेवटी माझ्याबरोबर राहील तो माझा नवरा ज्याच्या बरोबर मी माझे उभे आयुष्य व्यतीत केले आहे.

" सर्वानी उभे राहून टाळ्यांच्या गडगडातात तिच्या उत्तराचे स्वागत केले.

आपण आपल्या जीवनात अनेक व्यक्तींना भेटतो, ते आपल्या आयुष्यात येतात आणि जातात.

काहीजण थोड्या वेळापुरते आपल्या बरोबर असतात तर काहीजण शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतात.

तेव्हा आपल्या सर्व नात्यांचा आदर राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे पण त्याच बरोबर आपल्याला आपल्या
कुठल्या नात्यांना प्राधान्य दिले पाहिजे हे सुद्धा समजले पाहिजे

खडे

July 22, 2015




एकदा काही लोकांचा समूह चालत चालत पर्यटनाला निघाला.   
वाटेत त्यांना एक अंधारी बोगदा लागला. त्यांना त्या बोगद्यात काहीच दिसत नव्हते. 
त्या लोकांच्या पायाला काही खडे टोचू लागले.
काही लोकांनी ते खडे आपल्यानंतर येणा-या इतरांना टोचू नये,ईजा होवू नये म्हणून ते खडे उचलुन खिशात ठेवायला सुरु केले.
काहींनी जास्त खडे उचलले तर काहींनी कमी उचलले.
काही लोकांनी असा विचार केला की आपण कशाला फुकट उचलायचे.?
आपल्याला त्रास झालाच ना मग तसा इतरांनाही होइल.
त्यामुळे त्यातील काहींनी तर खडे उचललेच नाहीत.

जेव्हा ते सर्वजण त्या बोगद्याच्या बाहेर आले व खिशातून काढुन टाकण्यासाठी खडे बाहेर काढले तर ते खडे नव्हते तर अस्सल हीरे होते.
त्यावेळी कमी उचललेले लोक हळहळु लागले की जास्त खडे उचलले असते तर आपल्याला हीरे जास्त मिळाले
असते.

न उचललेले लोक पश्चाताप करू लागले.

आपले जीवनही या अंधा-या बोगद्यासारखेच असते व खड़े म्हणजे चांगुलपणा किंवा सत्कर्म आहे.

सत्कर्म हिऱ्यासारखे बहुमोल व किंमती आहे.... म्हणुन मिञांनो कायमच सत्कर्म करीत राहा...

आपोपापच फळ मिळेल...!!







*** तीन गाळणी *** The Three Sieves of Socrates

July 15, 2015

Socrates is a famous ancient Greek philosopher. He was born in Athens in 469 BC and was killed (by poison) in 399 BC (about 71 years old) because the government didn’t agree with his teaching. Socrates is widely credited for laying the foundation for Western philosophy.

सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला , " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास माहीत आहे की नाही ? "  

" भल्या माणसा , थोडा वेळ थांब , " सौक्रेटिसने त्याला थांबवले . कोणतीही गोष्ट ऐकण्यापूर्वी मी ती माझ्या तीन गाळण्यातून गाळून घेतो व नंतर ऐकतो ." 

" तीन गाळणी ? काय , आहेत तरी काय ती ? "

" हे पहा , माझे पहिले गाळणे आहे , माहितीची सत्यता ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते स्वत: पाहिले आहे काय ? "
" नाही , मी ऐकले आहे ." तो माणूस बोलला .


" ठीक आहे ." सौक्रेटिस म्हणाला . " आता दुसरे गाळणे .  मला असे सांगा की ते माझ्या मित्राबद्दल चांगले आहे की वाईट आहे ?"
" ओ ..... खरे तर ते चांगले नाही !" तो माणूस बोलला .
" म्हणजे तुम्ही अशी गोष्ट सांगणार आहात जी माझ्या मित्राबद्दल वाईट आहे , मात्र तिच्या सत्यतेबद्दल तुम्हाला कांही माहीत नाही ! बरोबर ? " सौक्रेटिसने विचारले . "


ठीक आहे . आता आपण तिसरे गाळणे लावूया . कदाचित त्यातुन तुम्ही खरे उतराल ."
" तिसरे गाळणे आहे उपयुक्ततेचे ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते माझ्यासाठी फायद्याचे आहे का ? "
" खरे तर नाही !" तो माणूस बोलला .
" हे पहा ," सौक्रेटिस म्हणाला , " जी गोष्ट माझ्या फायद्याची नाही , माझ्या मित्राबद्दल चांगले सांगीत नाही आणि जी खरी किंवा खोटी हे माहीत नाही , अशी गोष्ट ऐकून मी काय करणार ? म्हणून तुम्ही ही मला अजिबात सांगु नका . बाय ! "
.....आणि सौक्रेटिसने आपले काम पुढे चालू केले .


* मित्रानो , कोणाबद्दल ऐकण्यापूर्वी ही तीन चाळण अवश्य वापरा . तुमचा बहुमोल वेळ वाचेल आणि मित्रांबद्दलचा गैरसमज होणार नाही !!!

English Version
***************

One day, the old wise Socrates walks down the streets, when all of the sudden a man runs up to him "Socrates I have to tell you something about your friend who..."

"Hold up" Socrates interrupts him "About the story you're about to tell me, did you put it trough the three sieves?"

"Three sieves?" The man asks "What three sieves?"

"Let's try it" Socrates says.
"The first sieve is the one of truth, did you examine what you were about to tell me if it is true?" Socrates asks.
"Well no, I just overheard it" The man says.

"Ah, well then you have used the second sieve, the sieve of good?" Socrates asks "Is it something good what you're about to tell me?"
"Ehm no, on the contrary" the man answers.

"Hmmm" The wise man says "Let's use the third sieve then, is it necessary to tell me what you're so exited about?"
"No not necessary" the man says.

"Well" Socrates says with a smile "If the story you're about to tell me isn't true, good or necessary, just forget it and don't bother me with it."

John D. Rockefeller

अमेरिका की बात हैं. एक युवक को व्यापार में बहुत नुकसान उठाना पड़ा. उसपर बहुत कर्ज चढ़ गया, तमाम जमीन जायदाद गिरवी रखना पड़ी . दोस्तों ने भी मुंह फेर लिया, जाहिर हैं वह बहुत हताश था. कही से कोई राह नहीं सूझ रही थी. आशा की कोई किरण दिखाई न देती थी.

एक दिन वह एक park में बैठा अपनी परिस्थितियो पर चिंता कर रहा था. तभी एक बुजुर्ग वहां पहुंचे. कपड़ो से और चेहरे से वे काफी अमीर लग रहे थे.

बुजुर्ग ने चिंता का कारण पूछा तो उसने अपनी सारी कहानी बता दी.







बुजुर्ग बोले -” चिंता मत करो. मेरा नाम John D. Rockefeller है. मैं तुम्हे नहीं जानता,पर तुम मुझे सच्चे और ईमानदार लग रहे हो. इसलिए मैं तुम्हे दस लाख डॉलर का कर्ज देने को तैयार हूँ.”


फिर जेब से checkbook निकाल कर उन्होंने रकम दर्ज की और उस व्यक्ति को देते हुए बोले, “नौजवान, आज से ठीक एक साल बाद हम ठीक इसी जगह मिलेंगे. तब तुम मेरा कर्ज चुका देना.”


इतना कहकर वो चले गए. युवक shocked था. Rockefeller तब america के सबसे अमीर व्यक्तियों में से एक थे. युवक को तो भरोसा ही नहीं हो रहा था की उसकी लगभग सारी मुश्किल हल हो गयी. उसके पैरो को पंख लग गये.


घर पहुंचकर वह अपने कर्जो का हिसाब लगाने लगा. बीसवी सदी की शुरुआत में 10 लाख डॉलर बहुत बड़ी धनराशि होती थी और आज भी है.


अचानक उसके मन में ख्याल आया. उसने सोचा एक अपरिचित व्यक्ति ने मुझपे भरोसा किया, पर मैं खुद पर भरोसा नहीं कर रहा हूँ. यह ख्याल आते ही उसने चेक को संभाल कर रख लिया. उसने निश्चय कर लिया की पहले वह अपनी तरफ से पूरी कोशिश करेगा, पूरी मेहनत करेगा की इस मुश्किल से निकल जाए. उसके बाद भी अगर कोई चारा न बचे तो वो check use करेगा.


उस दिन के बाद युवक ने खुद को झोंक दिया. बस एक ही धुन थी, किसी तरह सारे कर्ज चुकाकर अपनी प्रतिष्ठा को फिर से पाना हैं.


उसकी कोशिशे रंग लाने लगी. कारोबार उबरने लगा, कर्ज चुकने लगा. साल भर बाद तो वो पहले से भी अच्छी स्तिथि में था.


निर्धारित दिन ठीक समय वह बगीचे में पहुँच गया. वह चेक लेकर Rockefeller की राह देख रहा था की वे दूर से आते दिखे. जब वे पास पहुंचे तो युवक ने बड़ी श्रद्धा से उनका अभिवादन किया. उनकी ओर चेक बढाकर उसने कुछ कहने के लिए मुंह खोल ही था की एक नर्स भागते हुए आई और झपट्टा मरकर वृद्ध को पकड़ लिया. युवक हैरान रह गया. नर्स बोली, “यह पागल बार बार पागलखाने से भाग जाता हैं और लोगो को जॉन डी . Rockefeller के रूप में check बाँटता फिरता हैं.”


अब वह युवक पहले से भी ज्यादा हैरान रह गया. जिस check के बल पर उसने अपना पूरा डूबता कारोबार फिर से खड़ा किया,वह फर्जी था. पर यह बात जरुर साबित हुई की वास्तविक जीत हमारे इरादे , हौंसले और प्रयास में ही होती हैं. 



हम सभी यदि खुद पर विश्वास रखे तो यक़ीनन किसी भी असुविधा से, situation से निपट सकते है.
Einstein ने एक बार का था- “ मैं उन सभी लोगों का शुक्रिया अदा करना चाहता हूँ, जिन्होंने मुझे मदद करने से इनकार कर दिया. क्योंकि उसी के कारण मैंने अपना सारा काम खुद किया.” दुसरे हमे मुसीबत के गड्ढे से निकालेगे इसका वेट करने के बजाय खुद ही क्यों न कोशिश करे.