Welcome

My mission is to empower people to find inner clarity and personal happiness through simple, uplifting, motivational, and applicable articles.

शुभ मुहूर्त.....सावधान

June 27, 2015

आपण सगळे शिकलेले आहात .तरी सुद्धा
                     
शुभ मुहूर्त.....सावधान
     ----------------------

कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात...???  
पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का  होतात, तर काही अकाली मृत्यू होतात असे का..???? 

95% विवाह हे मुहूर्तावर नुसार वेळेवर
लागत नाहीत तरी मुहूर्ताचा आग्रह का धरावा...????
  
मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणा-या सर्व उमेद्वारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात.असे का घडते.....????

मंत्रीपद मिळाल्यानंतर  मंत्रालयाची  जबाबदारी स्वीकारण्यासाठी  व खुर्चीवर बसण्यासाठी  शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात...????
 मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते...???


मानवाला किती अपत्य होणार हे नशिबात ठरलेले असतांना सुद्धा... कुटूंब नियोजनाद्वारे अपत्य होणे कसे थांबते..??? 
जन्म ठरलेला असतो तर कायदेशीर गर्भपातामुळे जन्म कसा थांबतो.???


शुभ मुहूर्तावर  मूल जन्माला घातल्यास  वैज्ञानिक,  राष्ट्रपती,  पंतप्रधान  होईल काय..??? 

अंबानी च्या जन्म मुहूर्त ला जन्माला आलेली  व्यक्ती ....ती पण ..अंबानीन सारखी  झाली का...???

उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर  , उद्योजक, आपल्या कार्यालयाचे  बांधकाम करतांना,  व्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात.....तरी सुद्धा  कित्येकांना अपयश येते असे का...????

शुभमुहूर्त  हे थोतांड आहे सत्य नव्हे...

ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो ,तेच लोकं अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.

मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली आणि कधीही मुहूर्त न पाहणारी ब्रिटिशशाही अख्खा  भारत देश गिळून बसली.
     
बांधवांनो ..

स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा.

जर कोणता पंडित, ज्योतिषी, बुवा, बापू, कापु, झापु महाराज,साधू ,साध्वी तथा वास्तूशास्त्र विशारद शुभमुहूर्तावरच सर्व काही केल्यास तथा वास्तूशास्त्राप्रमाणेच बांधकाम केल्यास यश येईल असे सांगत असतील तर..... स्टँम्प पेपवर लिहून देण्यास सांगा.

यश न आल्यास नुकसानभरपाईचा दावा ठोकेल  असे सांगा . ते तुमच्या जवळही फिरकणार नाहित.कारण त्यांनाही माहित असते हे सर्व थोतांड आहे.

जर तुमच मन साफ असेल व  तुमच्या त प्रयत्न करण्याची क्षमता असेल....तर तुमच्या साठी कोणतीही  वेळ  हि  ' शुभ मुहूर्तच ' असते "

श्रद्धा ठेवा....पण अंधश्रध्दा नको.

  विचार नक्कीच करा..  👏👏👏👏