Welcome

My mission is to empower people to find inner clarity and personal happiness through simple, uplifting, motivational, and applicable articles.

देवांची संख्या… ३३ कोटी देव आहे ????

July 14, 2013

सध्या एक फार मोठा गैरसमज आहे तो म्हणजे देवांची संख्या… ३३ कोटी देव आहे म्हणजे खरोखरच ३३००००००० (३३ कोटी) असे नाही तर संस्कृत भाषे मध्ये कोटी या शब्दाचा अर्थ “प्रकार” असा होतो. म्हणजेच ३३ प्रकारचे देव आहेत. याचाच अर्थ ३३ विविध गोष्टीना देव मानण्यात आले आहे, त्या खालील प्रमाणे….

धाता, मित्र, अर्यमा, शुक्र, वरून, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा, आणि विष्णू… असे १२ आदित्य. 


धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष, आणि प्रभास, हे ८ वसु…


हर, बहुरूप, त्रयम्बक,अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रेवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली, हे ११ रुद्र…


आणि याखेरीस २ अश्विनीकुमार…असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात…


धन्यवाद