कॉफी का सांडली...?
असे एक दृष्य डोळ्यांसमोर आणा कि तुम्ही कॉफी घेत बसलेला आहात.
तुमच्या मागुन अचानक कोणीतरी येतो आणि तो तुमच्या पाठीवर थाप मारतो किंवा तुमच्या मागुन जाता जाता तुम्हाला त्याचा धक्का लागतो.
त्यामुळे
तुमच्या हातात असलेल्या कपातील कॉफी डुचमळते आणि सांडते….
आता मला सांगा तुमच्या कपातील कॉफी का सांडली…?
तुम्ही मनात म्हणाल काय मुर्खासारखा प्रश्न विचारतो आहे….
आणि तुम्ही उत्तर द्याल,
” का सांडली म्हणजे काय…?
त्या माणसाने मला धक्का मारला किंवा त्याचा मला धक्का लागला म्हणुन माझ्या कपातील कॉफी सांडली… अजून काय..?"
आता बाळबोध विचारानुसार तुम्ही अगदी बरोबर सांगीतलेत… पण नाही, तुमचे उत्तर चुकिचे आहे…
कसे……??
अहो, तुमच्या कपामध्ये कॉफी होती म्हणून कॉफी सांडली…
त्यात जर चहा किंवा दुध असते तर कॉफी सांडली असती का..? नाही ना..?
म्हणून तुमचे उत्तर चूकिचे होते…
माझ्या कपात कॉफी होती म्हणून कॉफी सांडली,
असे उत्तर असायला हवे होते…? Very Simple Logic..
तुम्ही म्हणाल काय विचीत्र लॉजिक आहे…
नाही विचीत्र नाही..
याच घटनेची आपल्या रोजच्या आयुष्याशी सांगड घालून बघा..
कपाच्या आंत जे आहे तेच सांडत असतं हे लक्षात येईल तुमच्या..
.
.
जेव्हा आयुष्य अशा काही घटनांनी आपल्याला हलवतं तेव्हा जे आपल्या मनात असतं त्याप्रमाणेच आपली रिएक्शन बाहेर येते..
तेव्हा आपणच आपल्या मनाला विचारायला हवे…
बाबा, काय आहे रे तुझ्या कपात..?
आनंद,
कृतज्ञता,
शांती,
प्रेम,
नम्रता…?
की
क्रोध,
कटुता,
द्वेष,
असुया,
कठोर शब्द…..?
एकदा हे आपलं आपल्यालाच कळलं की उमजेल,
धक्का लागला की काय बाहेर येतं ते….!!!
मग आता निवडा
आता आपल्या कपात
खरच काय असायला हवे ते…
ठरवूयात 🙏